Ad will apear here
Next
नेटवर्क सुधारण्यासाठी ‘व्होडाफोन-आयडिया’तर्फे नवीन तंत्रज्ञान
मुंबई : व्होडाफोन आयडिया लिमिटेड या मोबाइल ऑपरेटर कंपनीतर्फे मुंबई महानगरात मोठ्या प्रमाणावर नेटवर्क अद्ययावत करण्याची मोहीम सुरू केली असून, महानगरात अधिक नेटवर्क क्षमता आणि कव्हरेज मिळण्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणावर मॅसिव्ह मायमो, स्मॉल सेल्स, टीडीडी साइट्ससारखे नवीन तंत्रज्ञान वापरण्यास सुरूवात केली आहे.

मुंबईतील कोट्यवधी ग्राहकांची डिजिटल कनेक्टिव्हीटीची गरज पुरवण्यासाठी ‘व्होडाफोन आयडिया’तर्फे पाच हजारांहून अधिक मॅसिव्ह ‍मायमो, स्मॉल सेल्स आणि टीडीडी साइट्स मुंबईतील महत्त्वपूर्ण ठिकाणी म्हणजेच चर्चगेट, प्रभादेवी, पाली हिल, लोखंडवाला, वर्सोवा, अंधेरी, जोगेश्वरी, बांद्रा आणि दादर अशा विविध ठिकाणी बसवल्या आहेत. कंपनीकडून मोठ्या गगनचुंबी इमारती आणि व्यावसायिक अशा प्रतिष्ठानांसाठीही एकोणीसशेहून अधिक डेडिकेटेड इनडोअर कव्हरेज सोल्यूशन्स ही बसवण्यात आली आहेत. नेटवर्कची क्षमता आणि कव्हरेज वाढवणे आणि ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान तैनात करण्याची मोहीम पुढील काही महिन्यांपर्यंत चालू राहील.

या प्रकल्पाविषयी माहिती देताना ‘व्होडाफोन-आयडिया लिमिटेड’चे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर विश्वांत व्होरा म्हणाले, ‘अधिग्रहणाआधीची योजना आणि नंतरच्या तीव्र  अशा अंमलबजावणीमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सातत्याने जोडणी राहून एक अजोड सेवा मिळत राहील याची दक्षता घेतली आहे आणि या सोबतच आम्ही आमच्या नेटवर्कचे अपग्रेड आणि एकत्रीकरण हे विविध सर्कल्समध्ये चरणबद्ध नितीने करत आहे. आम्ही आपल्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट नेटवर्क अनुभव देऊ करण्यासाठी जगभरांतील सर्वांत चांगल्या उपकरण पुरवठादारांबरोबर करार केला आहे.’     
 


जगातील सर्वांत मोठ्या नेटवर्क एकत्रीकरणाचा एक भाग म्हणून ‘व्होडाफोन-आयडिया’ने मुंबईत फोर-जी स्पेक्ट्रम रिफॉर्मिंग केले आहे. यामुळे आता महानगरातील फोर-जी ग्राहकांना आधीपेक्षा दुप्पट असा स्पीड उपलब्ध होणार आहे.  याबाबत बोलताना कंपनीचे मुंबईतील बिझनेस हेड सुनील तोलानी म्हणाले, ‘मुंबईला आता ‘डबल फास्ट’ झाली आहे. याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना आता फोर-जी नेटवर्कवर दुप्पट डाउनलोड स्पीड मिळणार आहे. आम्ही या गोष्टीचा प्रसार करण्यासाठी ओओएच, रेडिओ आणि डिजिटल अशा विविध मंचांचा उपयोग करून ग्राहकांपर्यंत पोहोचत असून, आम्हाला आशा आहे की लोक मुंबईतील या नवीन ग्राहाभिमुख नेटवर्क उपक्रमाचा लाभ घेतील.’   

‘व्होडाफोन-आयडिया’च्या तोलानी यांच्या हस्ते १५० व्या मॅसिव्ह मायमो साइटचे अंधेरी येथे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

(Please click here to read this news in English.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZOSBY
Similar Posts
‘आयडिया’ची ‘मॅजिक कॅशबॅक ऑफर’ मुंबई : भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचा प्रवाह रूढ करण्याशी असलेल्या आपल्या बांधिलकीला अनुसरत आयडिया सेल्युलर या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीने विविध ऑनलाइन तसेच डिजिटल माध्यमांतून रिचार्ज करणार्‍या ग्राहकांसाठी खास ‘मॅजिक कॅशबॅक ऑफर’ घोषित केली आहे.
‘आयडिया’ची ‘मेरी रिअल लाइफ’ मोहीम मुंबई : सोशल मीडियावरील स्‍वीकृती मिळवण्‍याच्‍यादृष्टीने ब्रॅंड आयडियाने ‘#MeriRealLife’ ही मोहीम सादर केली असून, या मोहिमेद्वारे लोकांना सोशल मीडियाचा वापर अधिक जबाबदारीने करण्यासाठी आवाहन केले आहे. आयडिया फोर-जीचा वापर करून सोशल मिडियावर आपले खरेखुरे आयुष्य प्रतिबिंबीत करण्याची ‘आयडिया’ या मोहिमेतून लोकांना देण्यात आली आहे
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल
‘भाजपने साधला समाजिक समतोल’ मुंबई : ‘सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व देण्याचे वचन भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने पाळले असून, एकूण ७८ पैकी नऊ जागांवर मुस्लिम समाजातील उमेदवारांना प्राधान्य देतानाच इतरही सर्व समाज घटकांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व हे भाजपचे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language